ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य

            मुंबई: ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात पर्यावरणकृषीपायाभूत सुविधाआरोग्यपर्यटनशिक्षणकृत्रिम बुद्धिमत्ता आदी क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचे सांगत थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            वर्षा निवासस्थानी श्री. कांग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये जॉन निकेलसचिन निकारगे यांचा समावेश होता.

         ब्रिटनच्या उप उच्चायुक्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्ये वाणिज्यीक संबंध आहेत. ब्रिटन हा भारतातील मोठा गुंतवणूकदार असून  त्यातील अनेक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य आहे. पर्यावरणउत्पादनशेतीपायाभूत सुविधाआरोग्यसेवाअक्षय ऊर्जाजैवतंत्रज्ञानकृत्रिम बुद्धिमत्तापर्यटनऔषधनिर्माण आणि शिक्षण या क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            ब्रिटनकडे या सर्व क्षेत्रांत जागतिक दर्जाचे प्रगत तंत्रज्ञान आहे. महाराष्ट्रात रस्तेउत्तम पायाभूत सुविधाकुशल मनुष्यबळ आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचे सर्वात मोठे योगदान असून थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंब

            महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिनाचा ३५० वा वर्षसोहळा साजरा करण्यात येत आहे. ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयात असणारी जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभाग पाठपुरावा करीत आहे. त्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळेविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी अधिकारी उपस्थित यावेळी होते.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech