महाराष्ट्रातील नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि शिर्डीसह देशभरात २१ ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यासाठी तत्वतः मान्यता

0

मुंबई: महाराष्ट्रातील नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि शिर्डीसह देशभरात २१ ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यासाठी तत्वतः मान्यता. महाराष्ट्रातील नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि  शिर्डी, गोव्यात मोपा,कर्नाटकातील विजापूर, हसन, कलबुर्गी आणि शिमोगा, मध्य प्रदेशातील डबरा (ग्वाल्हेर) उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि जेवार (नोएडा), गुजरातमधील ढोलेरा आणि हिरासर, पुद्दुचेरीतील कराईकल, आंध्र प्रदेशातील दगदार्थी, भोगापुरम आणि ओरवाकल (कुर्नूल), पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, सिक्कीममधील पाकयोंग, केरळमधील कन्नूर आणि अरुणाचल प्रदेशातील होलोंगी (कुर्नूल). इटानगर) या देशातील २१ ग्रीनफिल्ड विमानतळांच्या उभारणीसाठी भारत सरकारने ‘तत्त्वतः’ मान्यता दिली आहे.  . यापैकी  पश्चिम बंगालमधील दुर्गापूर विमानतळ, महाराष्ट्रातील शिर्डी आणि  सिंधुदुर्ग विमानतळ, केरळमधील कन्नूर विमानतळ, सिक्कीममधील पाकयोंग विमानतळ, कर्नाटकातील कलबुर्गी विमानतळ, आंध्र प्रदेशमधील ओरवाकल (कुर्नूल) विमानतळ  आणि उत्तर प्रदेशातील कुशीनगर असे 8 ग्रीनफिल्ड विमानतळ विमानतळ कार्यान्वित करण्यात आले आहेत.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक हवाई दळणवळणाला  चालना देण्यासाठी आणि   परवडणारी हवाई वाहतूक जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी  ऑक्टोबर, 2016 मध्ये प्रादेशिक हवाई दळणवळण  योजना (RCS) – UDAN (उडान  -उडे देश का आम नागरिक) सुरू केली. या योजनेंतर्गत विमानतळांचा विस्तार/विकास ‘मागणीवर आधारित’ असून विविध सवलती पुरवण्यासाठी राज्य सरकार तसेच  विमानकंपनी चालकांच्या प्रतिबद्धतेवर  अवलंबून आहे.

उडानअंतर्गत बोलींच्या  चार फेऱ्यांच्या आधारे, उत्तर प्रदेशसह देशभरात विविध ठिकाणी 14 जल विमानतळ  आणि 36 हेलिपॅडसह 154 विमानतळ निश्चित करण्यात आले आहेत.  14.03.2022 पर्यंत, 8 हेलीपोर्ट्स आणि 2 जल विमानतळांसह  66 सेवेत नसलेल्या  आणि सेवेत कमी असलेले  विमानतळ कार्यान्वित केले गेले आहेत. कार्यान्वित करण्यात आलेल्या   66 विमानतळ/हेलिपोर्ट/जल विमानतळांची  यादी जोडली आहे.

परिशिष्ट

उडान  योजनेअंतर्गत कार्यान्वित केलेल्या 66 विमानतळ/हेलिपोर्ट/जल विमानतळांची यादी

S No. State Airport
Andhra Pradesh Kadapa
Kurnool Airport
Assam Jorhat
Lilabari
Tezpur
Rupsi
Arunachal Pradesh Tezu
Passighat
Bihar Darbhanga
Chhattisgarh Jagdalpur
Bilaspur
Daman & Diu Diu
Gujarat Bhavnagar
Jamnagar
Kandla
Mundra
Porbandar
Statue of Unity (W)
Sabarmati River Front  (W)
Haryana Hissar
Himachal Pradesh Shimla
Kullu
Mandi (H)
Rampur (H)
Karnataka Belgaum
Hubli
Mysore
Vidyanagar
Kalaburgi (Gulbarga)
Bidar
Kerala Kannur
Madhya Pradesh Gwalior
Maharashtra Gondia
Jalgaon
Kolhapur
Nanded
Ozar (Nasik)
Sindhudurg
Meghalaya Shillong
Nagaland Dimapur
Odisha Jharsuguda
Pondicherry (UT) Pondicherry
Punjab Adampur
Bhatinda
Ludhiana
Pathankot
Rajasthan Bikaner
Jaisalmer
Kishangarh
Sikkim Pakyong
Tamil Nadu Salem
Uttar Pradesh Agra
Allahabad
Kanpur(Chakeri)
Hindon
Bareilly
Kushinagar
Uttarakhand Pantnagar
Pithoragarh
Sahastradhara (H)
Chinyalisaur (H)
Gaucher (H)
New Tehri (H)
Srinagar  (H)
Haldwani (H)
West Bengal Durgapur

W- Water Aerodrome ; H – Heliport

नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील राज्यमंत्री जनरल (डॉ) व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech