श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक – मुंबई शहर जिल्हाधिकारी

0

मुंबई : मुंबईतील श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. यापुढे कोणतेही पाळीव प्राणी दुकाने, श्वान प्रजनन व विपणन केंद्र महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरु ठेवता येणार नसल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा मुंबई शहर प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीचे अध्यक्ष यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

सर्व पाळीव प्राणी दुकान व श्वान प्रजनन व विपणन केंद्र चालवू इच्छिणा-या व्यक्तीस आवाहन करण्यात येत की, प्राण्यांना कृपरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम २०१८ व पाळीव प्राणी दुकानांची व श्वान प्रजनन व विपणन नियम २०१७ अन्वये श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. आपण आपल्या दुकान केंद्राची नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज Maharashtra state Animal Welfare Board यांच्या नावे रुपये ५०००/- (अक्षरी-पाच हजार रुपये मात्र ) च्या धनाकर्षासह ( Demand Draft) महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण मंडळ, पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेज समोर औध, पुणे. 67 या पत्यावर दाखल करावा. हा अर्ज पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या खालील संकेतस्थळावर उपलब्ध असून जिल्हाधिकारी, मुंबई शहर तथा अध्यक्ष, प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी मुंबई शहर यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

 

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech