पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे पूरग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

0

 

कोल्हापूर : पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पुल रस्ता पूर बाधित भागाची पाहणी करताना नागरिकांना दिला.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

यावेळी पंचगंगा हॉस्पिटल परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धान्य वाटप करण्यात आले.

0000

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा

 

कोल्हापूर:- नागरिकांनो ! घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे . संयम बाळगा . येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहुपूरी 6 व्या गल्लीतील पूरबाधित राहिवाशांशी अत्यंत आत्मियतेने संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आज कोल्हापूरात आले होते.

यावेळी स्थानिक रहिवासी पूजा नाईकनवरे यांनी, आपत्कालीनस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिला असल्याचे सांगितले .तर पूरबाधित गणेश पाटील म्हणाले, यंदा २००५ व २०१९ पेक्षाही मोठा असून शासनाने भरीव मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतूराज पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार ,मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech