‘पोकरा’ अंतर्गत २२६१ कोटी निधी खर्च करण्यात यश

0

मुंबई: ‘पोकरा’अंतर्गत २२६१ कोटी निधी खर्च करण्यात यश. जागतिक बँकेने सहा वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर केलेल्या ४००० कोटी रुपयांच्या कर्जापैकी २२६१ कोटी म्हणजे ५६ टक्क्यांहून अधिक खर्च तीन वर्षांत करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाने चांगली कामगिरी केली आहे. शेतीला आणि शेतकऱ्यांना बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी सक्षम करणे हा या प्रकल्पाचा उद्देश असून त्या दिशेने अंमलबजावणी करण्यात ‘पोकरा’ला मोठे यश प्राप्त होताना दिसत आहे.

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी प्रकल्प जिल्ह्यामध्ये जाऊन सरपंच, शेतकरी आणि महिलांना प्रकल्पाचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रकल्पाचे डीबीटी पोर्टल व मोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांना लाभ घेण्याची प्रक्रिया वेगवान व पारदर्शक झाली आहे. सव्वातीन लाख शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात १८७३ कोटी, तसेच १४२० शेतकरी गटांच्या व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खात्यांत १४४ कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहे.

पोकराची कामगिरी लक्षात घेऊन राज्य शासनाने या प्रकल्पासाठी भरघोस तरतूद केल्यामुळे शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांनी पूर्ण केलेल्या कामांसाठी अनुदान देणे शक्य झाले आहे, असे प्रकल्प संचालक आयएएस राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

एक वर्षात १३१७ कोटींचा निधी खर्च
शेतकऱ्याला एखाद्या बाबीचे महत्त्व पटले आणि विश्वासार्हता निर्माण झाली की शासकीय प्रकल्पातून उल्लेखनीय कामगिरी होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पातून हे दिसून आले आहे. थेट लाभ हस्तांतरणाची (डीबीटी) प्रणालीद्वारे नुकत्याच पूर्ण झालेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षात पोकरा प्रकल्पासाठी एकूण १३५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी १३१७.३६ कोटी रुपये निधी खर्च करण्यात यश आले आहे. शेती संबंधी लाभांपोटी डीबीटीद्वारे थेट खात्यात वितरण करण्यात आलेली ही सर्वांत मोठी रक्कम आहे.
सन २०२१- २२ या वर्षात वैयक्तिक लाभाच्या बाबींकरिता प्रकल्पांतर्गत १५ जिल्ह्यांतील 3 लाख 24 हजार 045 शेतकऱ्यांची DBT पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून आतापर्यंत 10 लाख 70 हजार 456 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ‘पोकरा’अंतर्गत या एका आर्थिक वर्षात १ लाख ९० हजार ५३२ शेतकऱ्यांचे पोकरा प्रकल्पाअंतर्गत विविध बाबींसाठी एकूण २ लाख २२ हजार ०११ अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर १११५.१८ कोटी रुपये इतके अनुदान हस्तांतरित करण्यात आलेले आहे.

याप्रमाणे प्रकल्प सुरू झाल्यापासून आतापर्यंत २ लाख ९८ हजार ९९४ शेतकऱ्यांनी विविध घटकांसाठी ४ लाख १५ हजार ३८६ अर्ज केले होते. त्यापोटी १८७३.१३ कोटी रुपये अनुदान त्यांच्या आधार लिंक्ड खात्यांवर हस्तांतरित करण्यात आले आहे.

कषीपूरक व्यवसायांना पाठबळ

  • कृषीपूरक व्यवसायांसाठी प्रकल्प जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी,स्वयंसहाय्यता गट व शेतकरी गटांच्या १२१५ प्रस्तावांना १२३.१६ कोटी इतके अनुदान देण्यात आले आहे. प्रकल्प सुरु झाल्यापासून आजअखेर १४०३ व्यवसाय प्रस्तावांना १४२.२६ कोटी अनुदान अदा करण्यात आलेले आहे.
  • प्रकल्पातील ३८०० गावाचे विकास आराखडे तयार केले.

– मृद व जलसंधारणाची ९८८ कामे पूर्ण करण्यात आलेली असून त्यावर १६.८५ रुपये कोटी खर्च करण्यात आला आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून आजअखेर १५४२ कामांवर रुपये २७.९९ कोटी खर्च  करण्यात आले आहेत.

  • सन2021-22 मध्ये प्रकल्प गावांत एकूण ९९२४ (खरीप हंगामात ६१०० व रब्बी हंगामात ३८२४) शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये ३४९०५२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
  • खरीप हंगाम (२०२१) मध्ये १७४८० हे. क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये ९६०५ शेतकरी सहभागी झाले होते. तसेच रब्बी हंगाम (२०२१) मध्ये ८००७ हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये ६४३२ शेतकरी सहभागी झाले होते.
  • प्रकल्प गावातील १५५६६१ शेतकऱ्यांनी107863 हे. क्षेत्र सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केलेला आहे.
  • प्रकाल्पाअंतर्गत २० हजार ०१० शेतकऱ्यांनी ६०४८ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech