मुंबई :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन. भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले.
प्रारंभी मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्व. गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थितांना ‘सद्भावना’ दिवसानिमित्त प्रतिज्ञाही दिली.