महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शहीद दिन साजरा

0

नाशिक:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शहीद दिन साजरा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये शहीद भगतसिंग,राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शहीद दिन साजरा करण्यातआला. यावेळी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प.,अ.वि.से.प.वि.से.प, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजितपाठक, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी शहीदभगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. याप्रसंगी डॉ. उदयसिंह रावराणे, श्री. ए.के.सोनवणे, श्री. नितीन काळे, श्री. नितीन शिंदे, श्री. किशोर पाटील, श्री. संदीप ततार, श्री. राजेश इस्ते, श्री. प्रशांत पवार, श्री. किशोर गांगुर्डे, श्री. सचिन जोशी, श्री. संभाजी गायकवाड उपस्थित होते.

याप्रसंगी कोविड-19 संदर्भात शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले. याप्रसंगी हुतात्मा भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या बलीदानाची माहिती डॉ. स्वप्नील तोरणे यांनी दिली.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech