सातारा दि. २५ – कराड येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. कराड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या वेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माझी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार आदी उपस्थित होते.
या नवीन शासकीय विश्रामगृहासाठी २० कोटी २२ लाख ३४ हजार रुपये इतका निधी मंजूर आहे. त्या
पैकी १५ कोटी ७५ लाख ५२ हजार रुपयांची कामे स्थापत्य स्वरूपाची असून उर्वरित कामे विद्युतीकरण v फर्निचरची आहेत. एकूण ४ मजल्यांच्या या इमारतीमध्ये ३ व्हीव्हीआयपी कक्ष, १ पी. ए. कक्ष व ४ अधिकारी कक्ष आहेत. प्रत्येक व्हीव्हीआयपी कक्षामध्ये वेटींग रुम, बैठक खोली, जेवण खोली व शयनगृह यांचा समावेश आहे.