गुवाहाटी, 22 फेब्रुवारी : गुलाबचंद कटारिया यांनी बुधवारी आसामचे ३१ वे राज्यपाल म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र, पंजाबी येथील सभागृहात आयोजित एका संक्षिप्त समारंभात आसामचे 31 वे राज्यपाल म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता श्री गुलाबचंद जी कटारिया को असम के राज्यपाल बनाए जाने पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
आपका ओजस्वी व प्रभावी व्यक्तित्व एवं राजनीतिक अनुभव असम की उन्नति का नया अध्याय लिखेगा।#GulabChandKataria #AssamGovernor @BJP4India @BJP4Assam pic.twitter.com/msfzlJ7shD— Diya Kumari (@KumariDiya) February 22, 2023
राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे राजस्थानमधील उदयपूरचे रहिवासी आहेत. राज्यपालपदी नियुक्तीपूर्वी त्यांनी राजस्थानचे गृहमंत्री आणि राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम केले होते.