घोडबंदरच्या गौरव एनक्लेव सोसायटीतील कुटुंबांना नियमित घरभाडे देण्यासाठी मनपा आयुक्त बैठक घेणार

0

मुंबई:- घोडबंदरच्या गौरव एनक्लेव सोसायटीतील कुटुंबांना नियमित घरभाडे देण्यासाठी मनपा आयुक्त बैठक घेणार. घोडबंदरच्या गौरव एनक्लेव सोसायटीतील कुटुंबांना नियमित घरभाडे देण्यासाठी मनपा आयुक्त बैठक घेणार. मीरा भाईंदर येथील गौरव एनक्लेव को-ऑप. हौसिंग सोसायटीची इमारत पुनर्विकासासाठी रिकामी केल्यामुळे संबंधित विकासकाने येथील रहिवाशांना  करारानुसार नियमितपणे भाडे देणे आवश्यक आहे. ते भाडे मिळवून देण्यासाठी  विकासकाबरोबर बैठक घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येतीलअसे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत रवि राणागीता जैन या सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नगरविकासमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर भागात गौरव एनक्लेव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीची तळमजला अधिक ७ मजली इमारत १९९५ मध्ये बांधण्यात आली आहे. सदर इमारत धोकादायक ठरल्याने ती २०१३ मध्ये पाडण्यात आलीत्यानंतर सीआरझेडचा भाग वगळून या इमारतीला २०१९ मध्ये २१ मजल्याची परवानगी महानगरपालिकेने दिलीमात्र या इमारतीसंदर्भात काही वाद उद्भवल्याने २०१९ मध्येच या इमारतीच्या बांधकामाची परवानगी रद्द केली. सदर विकासक उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने त्यात स्थगिती दिलीही स्थगिती आजही कायम आहेअसेही नगरविकासमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यानया विकासकाने नगरविकास विभागाकडे अपील केले होते. वादग्रस्त सर्वे क्रमांक असतील ते बाजूला ठेवून नियमाप्रमाणे कागदपत्रे तपासून महानगरपालिकेने नगररचना नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेतयामुळे २३३ वंचित कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईलअसे सांगून महानगरपालिका आयुक्तांनी विकासक आणि या इमारतीतील रहिवाशांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घ्यावी आणि विकासकाकडून येथील रहिवाशी कुटुंबांना नियमितपणे घरभाडे मिळवून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही शेवटी नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech