मुंबई: दिव्यांगासाठीच्या नॅशनल करिअर सेंटरकडून दिव्यांगांना महिला दिनी शिलाई मशिनचे वाटप. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून मुंबई येथील नॅशनल सर्विस सेंटर, यांच्याकडून आंतरराष्ट्रीय महिला दिनी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ सुरेश कुमार कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात डॉ दिलखुष किशनचंदानी यांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्या व जागरुकता या विषयावर मार्गदर्शन केले.
तसेच त्यांनी दिव्यांग मुलींना याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचे सांकेतिक भाषेत रुपांतर स्नेहा विचारे यांनी केले. त्यानंतर मेश्राम फाऊंडेशनच्या सुफिया खान यांनी विशेष अतिथी या नात्याने दिव्यांग व्यक्तिंना सक्षम बनवण्याकरिता मार्गदर्शन केले.
शिवम चॅरिटेबल ट्रस्ट, रेखा माल्या, दीपक वचारे, रोटरी क्लब-नवी मुंबई यांनीही कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
15 प्रशिक्षित मुलींना कार्यक्रमात शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले, आरोग्य विषयक साहित्यही देण्यात आले. तसेच त्यांना आर्थिक मदतही देण्यात आली.