धुळे – मालमत्ताकर थकविल्याप्रकरणी महाराष्ट्र बॅकेची इमारत सील

0

धुळे :  एक कोटी १४ लाख रूपयांचा मालमत्ताकर थकविल्या प्रकरणी महापालिकेच्या वसुली विभागातर्फे आज बँक ऑफ महाराष्ट्राची इमारत सील करण्यात आली. महापालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे यांनी थकीतकर वसुलीसाठी स्वतंत्र पथक नेमले असून या पथकामार्फत ठिकठिकाणी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. महाराष्ट्र बँकेच्या गल्ली नं- ४ मधील शाखेवर जाऊन अधिकार्यांनी बँकेची इमारत सीलकेली.आज सकाळी ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडालीआहे. शहरातील मालमत्ता धारकांनी आपल्याकडील मालमत्ता व पाणीपुरवठा कराची थकबाकी त्वरीत भरून महापालिकेला सहकार्यकरावे व कटू कार्यवाही टाळावी असे आवाहन वसुली पथकाद्वारे करण्यातआले आहे.

यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार शहरातील ग.नं. ४मध्ये राजवाडे संशोधन मंडळाची वास्तु आहे. या वास्तुमध्येच बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा उघडण्यातआली आहे.राजवाडे संशोधनमंडळातर्फे महाराष्ट्र बँकेलाभाडेतत्वावर इमारत देतांना करारकेला आहे. महापालिकेतर्फेआकारला जाणारा कर बँकेने स्वतःअदा करावा. असे या करारात नमूदकेले आहे. मात्र २०११ पासून मार्च२०२३ पर्यंत बँक व्यवस्थापनाने महापालिकेने आकारलेल्यामालकत्ता करापोटी एक कोटी १४ लाख ३६ हजार ६९२ रूपये थकविले आहेत. शास्तीसहआकारण्यात आलेली ही रक्कमवसुलीसाठी महापालिकेने बँकेलानेकदा नोटीस बजाविलेली आहे.मार्च २०२३ मध्ये जिल्हा न्यायविधीच्या माध्यमातून तडजोडीसाठीची नोटीसही देण्यातआली.या तडजोडीलाही बँकेने नकारदिला आहे. यामुळे वसुली विभागाने बँकेला पुन्हा नोटीस देवून कारवाईचा इशारा दिला होता. तथापि, बँक व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसादन दिल्याने अखेर आज सकाळी महापालिकेचे वसुली अधिकारी शिरीष जाधव, लिपीक मधुकर वडनेरेयांच्यासह पथकातील मुकेशअग्रवाल, सुभाष गढरी, संजय शिंदे,अनिल सुडके, राजू गवळी, प्रदिपपाटील, अनिल जोशी, मधुकरपवार, अशोक मंगीडकर यांनी बँकऑफ महाराष्ट्र बँकेला सिल ठोकण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे पेठ भागात खळबळउडाली आहे.६ दुकानही केली सिलमनपा वसुली पथकाने आज बसस्थानका जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागिल के.डी.मिस्तरी शॉपिेंगकॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने देखील आज मालमत्ता कर थकबाकी न भरल्याने सील केली. सहा दुकानदारांकडे सुमारे ३ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीतआहे. नोटीस बजावून देखील संबंधीत दुकानदारांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर दुकाने सील करण्याची कारवाई आज करण्यात आली.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech