डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे येण्याची शक्यता गृहीत धरून समन्वयाने नियोजन करावे

0

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने मोठ्या संख्येनेअनुयायी चैत्यभूमी येथे  येण्याची शक्यता गृहीत धरून समन्वयाने नियोजन करावे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे  येण्याची शक्यता गृहीत धरून सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने पूर्व तयारी करिता आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकरदूरदृश्य प्रणालीव्दारे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाणवाहतूक विभागाचे उपायुक्त रोशनविभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त मनोज रानडे पोद्दार रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी अनिल, रेल्वेचे राकेश कुमार गुप्ता महानगरपालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच विविध संघटनेचे प्रदीप कांबळे, नागसेन कांबळे, श्रीकांत भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

   श्री. पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे भाविकांना चैत्यभूमीकडे येता आले नाही. त्यामुळे या वर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या  131 व्या जयंतीनिमित्त अनुयायी देशभरातून मोठ्या प्रमाणात मुंबईत येण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. पोलीसमहानगरपालिका यांनी दक्ष राहावे. मोठ्या संख्येने अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आपली तयारी ठेवून काम करावे. कोविड-१९ विषाणू संसर्ग नियंत्रणात आला असला, तरी खबरदारी घेण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


जिल्हाधिकारी कार्यालय | मुंबई शहर | India – Mumbai City

https://mumbaicity.gov.in 

 

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech