भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून श्रद्धांजली सभा

0

 मुंबई: भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून श्रद्धांजली सभा. ज्येष्ठ गायिका, भारतरत्न मंगेशकर लताजी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

            उद्या  गुरुवार दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता रुईया महाविद्यालय माटुंगा येथे या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच या श्रंद्धाजली कार्यक्रमाचे  युट्यूब (youtube) च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होणार आहे.

            YouTube https://youtube.com/channel/UCP2tI2ByPMnxnVgtsmNWYjA

            FACEBOOK : https://www.facebook.com/udayravindrasamant/ या लिंकद्वारे राज्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सहभागी होता येईल.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech