मुंबई : आधार सर्व्हरमधील त्रुटी दूर झाल्याने धान्य वितरण सुरळीत सुरू. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत पात्र लाभार्थींची ई-पॉसद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तुंचे वितरण करण्यात येते. रास्तभाव दुकानातील ई-पॉस उपकरणांमध्ये मागच्या आठवड्यात आधार सर्व्हरमुळे तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे धान्य वितरण संथ गतीने होत होते. तथापि सदर तांत्रिक अडचण आता दूर झाली असून मागील 4 दिवसांपासून धान्य वितरण सुरळीत होत आहे. मागील 4 दिवसांमध्ये राज्यातील रास्तभाव दुकारातील ई-पॉसद्वारे 30.09 लक्ष व्यवहार झाले आहेत, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.
Previous Articleशेतपिकांच्या नुकसान भरपाई करिता 125 कोटी रूपये निधी वितरीत
About Author
Related Posts
-
पायाभूत सुविधाच नव्हे तर इतरही क्षेत्रात क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वंदे मातरम् आणि राज्यगीताने सुरूवात
-
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस