नवी मुंबईतून 3 बांगलादेशी नागरिक गिरफ्तार

0

मुंबई, 18 फेब्रुवारी : दहशतवादविरोधी पथकाने (ATS) नवी मुंबई परिसरातील करावे गावातून 3 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.

हे तिघे बांगलादेशी नागरिक गेल्या २८ वर्षांपासून करावे गावात बोगस कागदपत्रांच्या आधारे राहून मासे विक्रीचा व्यवसाय करत होते. या तिघांची कसून चौकशी सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करावे, नवी मुंबई येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाचे नाव नुरिया उर्फ ​​गना बाबुल पठाण असे आहे. एटीएसच्या पथकाने नुरियाला त्याच्या पालकांसह अटक केली आहे.

या तिघांच्या चौकशीत, 1995 साली बोगस कागदपत्रांच्या आधारे नुरिया बांगलादेशातून कोलकातामार्गे मुंबईत आल्याचे उघड झाले. यानंतर नुरियाने आई-वडिलांना नवी मुंबईत आणले आणि करावे गावात मासे विकून आपला उदरनिर्वाह चालवला.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech