ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस

0

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते खाऊ व पुस्तके वाटप करण्यात आली.

स्वयम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ठाण्यातील स्व. गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांगांच्या रोजगारासाठी उपयुक्त अशा स्वयम् अॅपचे अनावरण, स्वयम् च्या ‘झेप’ या स्मरणिकेचे व संकेतस्थळाचे अनावरणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वयम् अॅपच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार संधीची माहिती मिळणार आहे. यावेळी दिव्यांगांसाठी भरविण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनाची पाहणीही मुख्यमंत्री महोदयांनी केली. यावेळी स्वयम् च्या संस्थापक डॉ. निता देवळालकर उपस्थित होत्या.

नागरिकांच्या शुभेच्छांचा केला स्वीकार

मुख्यमंत्र्यांनी आनंदआश्रमात धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या शुभेच्छांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वीकार केला. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech