क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

0

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

“देशातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपून आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात आणखी भरारी घ्यावी, हेच सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन असेल”, अशा शब्दांत मुख्यमंत्री महोदयांनी अभिवादन केले.

यावेळी तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

आद्य शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, कवियित्री  क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा विभाग मंत्री  दीपक केसरकर यांनी  त्यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन (प्रशासकीय सुधारणा) विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

 

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech