ऊर्जा संवर्धन सप्ताहाचा शुभारंभ

0

ऊर्जा संवर्धन सप्ताहाचा शुभारंभ महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) तर्फे दि. १४ ते २० डिसेंबर या कालावधीत ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ऊर्जा संवर्धनाबद्दल प्रचार व प्रसार करण्यासाठी महाऊर्जाने तयार केलेल्या चित्ररथाला बुधवार, दि. १४ डिसेंबर या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवशी महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि वीज कंपन्यांचे ,(स्वतंत्र) संचालक विश्वास पाठक यांनी हिरवा झेंडा दाखवित या सप्ताहाचा शुभारंभ केला.

या चित्ररथावर एलईडी डिस्प्ले बसविण्यात आला असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा बचतीच्या संदेशासह विविध चित्रफिती दाखविण्यात येणार असून सोबतच ऊर्जा संवर्धनाचा संदेश देणारे विविध बॅनर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. याशिवाय रेडिओ जिंगल्स ऐकविण्यात येत आहेत. शासकीय कार्यालये, शाळा तसेच गर्दीच्या ठिकाणी हा चित्ररथ उभा करण्यात येईल. राज्याच्या प्रत्येक महसुली विभागात एक अशा एकूण सात चित्ररथाच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धनाचा संदेश सर्वत्र प्रसारीत करण्यात ये येणार आहे.

आजच्या काळात वीज ही आपली मुलभूत गरज झाली आहे. आपल्या मोबाईल फोन पासून ते आधुनिक ई-वाहनापर्यंत सर्व काही वीजेवर चालतं आणि भविष्यात या यादीत भरच पडणार आहे. महावितरण वीज पुरवण्याचे कार्य निरंतर करीतच राहिल. परंतू आपल्याला भविष्यात जर ऊर्जेचा लाभ घ्यायचा असेल तर वर्तमानात ऊर्जा काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. तसेच सौर ऊर्जा (सोलर एनर्जी) सारखे पर्याय निवडणे आवश्यक असल्याचे श्री विजय सिंघल यांनी यावेळी सांगितले. सोबतच, ऊर्जेचे संवर्धन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

ऊर्जा संवर्धन दिनाच्या निमित्ताने महावितरणतर्फ़े दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. ऊर्जा बचत करणाऱ्या खासगी संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि शासकीय कार्यालयांना पुरस्कारही वितरीत करण्यात येतात. सोबतच विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

फोटोचा मजकूर – ऊर्जा संवर्धन रथाला हिरवी झेंडी दाखवून ऊर्जा संवर्धन मोहिमेचा शुभारंभ करताना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल व विश्र्वास पाठक.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech