महाराष्ट्र: शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जदाता झाला पाहिजे, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन. आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा पर्याय देण्यास सक्षम असून शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. गडकरी यांच्या हस्ते आज सांगली आणि सोलापूर शहरांना रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या बोरगाव – वाटंबरे राष्ट्रीय महामार्ग 166 आणि सानंद जत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 165 या दोन महामार्गांचे आज लोकार्पण करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जयंत पाटील ,जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य , दत्तात्रय भारणे ,सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य आणि डॉ. विश्वजित कदम सहकार ,कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि खासदार संजयकाका पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.