मुंबई : पाणी बचतीसाठी वर्तनात बदल आवश्यक. पाणी बचतीसाठी आपल्या वर्तनात बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
जागतिक जल दिनानिमित्त आयोजित विशेष प्रदर्शनाचे आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्राधिकरणाचे सदस्य ॲड. साधना महाशब्दे, श्वेताली ठाकरे, प्राधिकरणाचे सचिव रामनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.
श्री. कुलकर्णी म्हणाले, जागतिक जल दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने जल साक्षरता सप्ताह आयोजित केला जातो. या निमित्ताने पाण्याबाबत साक्षरता निर्माण व्हावी, पाणी बचतीबाबत विद्यार्थी, महिला आणि समाजातील सर्व घटकांत जाणीव जागृती निर्माण व्हावी, असा उद्देश आहे. कारण पाण्याची बचत करणे, संवर्धन करणे आणि त्याबाबत जाणिव जागृती करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
यावेळी श्रीमती महाशब्दे, श्रीमती ठाकरे, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालक रुपा नाईक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वांना जल प्रतिज्ञा देण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन दिलीप पाटोळे, प्रशांत बोरसे, राहुल सोडल यांनी केले. सूत्रसंचालन शशिकला डंभारे यांनी तर विश्वजीत करंजीकर यांनी आभार मानले.