आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान भवनातयांचे अभिवादन

0

मुंबईआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकारभारताचे माजी उपपंतप्रधानमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचलास्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणेहेच त्यांना खरे अभिवादन ठरेलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप पंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात कीआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होता. देशप्रेमाने भारावलेले त्यांचे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे संरक्षणअर्थगृहपरराष्ट्र मंत्रीउपपंतप्रधान पद त्यांनी भूषविले. या संपूर्ण कारकिर्दीत जनतेशी नाळ त्यांनी कायम जोडली होती. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव होता.  सामाजिक कार्य आणि साधी राहाणीवाचनाची आवड हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक तरुणांमधील नेतृत्वगुण व धडाडी ओळखून त्यांना पुढे आणले. कृषीशिक्षणसहकारसामाजिकसांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांची जाण असलेले त्यांचे नेतृत्व होते. देशाचे संरक्षण मंत्री असताना त्यांनी दिलेले योगदान देश कायम स्मरणात ठेवेल. त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेलअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप पंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech