विजय वडेट्टीवार – इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

0

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्याने करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळेल, जनतेने संकेतस्थळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

सिंहगड या निवासस्थानी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, सहसचिव देवाप्पा गावडे, उपसचिव कैलास साळुंखे, सिद्धार्थ झाल्टे, कक्षाधिकारी किशोर फुलझुले, संकेतस्थळ निर्मितीचे वरिष्ठ सल्लागार देविदास सुसे, विजयसिंह राजपूत, प्रल्हाद अनलम, साक्षी गोराड, सिल्वर टेक्नॉलॉजीचे शुभम राणे यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळामुळे जनतेला घरबसल्या सर्व माहिती मिळण्यास मदत होणार आहे. हे संकेतस्थळ मराठी व इंग्रजी दोन्ही भाषातून आहे. https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/en असे या संकेतस्थळाचे नाव आहे. या संकेतस्थळावरील माहिती विद्यार्थी तसेच जनतेला अत्यंत उपयुक्त अशी आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागानेही नव्याने या विभागाचे होणाऱ्या निर्णयांची व तसेच उपक्रमांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करावी, जेणेकरून जनतेला याची माहिती मिळेल.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech